मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 5 जानेवारी 2023 (16:02 IST)

शिंदे‘व्हाईसरॉय ऑफ महाराष्ट्र’- आव्हाड

jitendra awhad
मुख्यमंत्र्यांना वाटतं संपूर्ण ठाणे माझ्या हातात असावं. अरे शरद पवारांनी बारामतीत एवढे वर्षे राजकारण केलं, त्यांचंही बारामती होऊ शकलं नाही.असं कधी असतं का? असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. कायदा आणि सुव्यवस्था आमच्या हातात आहे. आम्ही सांगू तो कायदा आणि तो पोलिसांनी मानला पाहिजे, अशा पद्धतीचा कायदा महाराष्ट्रभर राबवला जातो आहे. ठाण्यात तर टिपून टिपून मारतात असेही ते म्हणाले. काल नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी निशाणा साधला.
 
जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नाहीत, तर ‘व्हाईसरॉय ऑफ महाराष्ट्र’ आहेत.व्हाईसरॉयच्या हातात कायदा होता, तो कोणाचंही ऐकायचा नाही तसे हे व्हॉईसरॉय असल्याची टीका आव्हाडांनी केली. नवी मुंबईच्या निवडणुका येतील तेव्हा नशीब पोलिसांना मतदान करायला सांगितलं नाही.आता एवढंच शिल्लक राहिलं आहे.नाहीतर पोलिसांना सांगतील तुम्ही जाऊन बटन दाबून या, असा टोलाही लगावला.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor