शिवसेनेच्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षता : प्रवीण दरेकर

pravin darekar
Last Modified मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (15:28 IST)
सरकार आघाडी सांभाळेल, तुमची आपली जबाबदारी काय आहे तर आपल्याला गाव सांभाळायचा आहे. हे गाव सांभाळत असताना आघाडीचा विचार नाही तर फक्त शिवसेनेचा विचार करायचा असल्याचे विधान शिवसेना नेते अनंत गिते यांनी केलं आहे.महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री शिवसेनामधील आहे परंतु शिवसेनेच्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षता येतायत असे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलं आहे. गितेंचे वक्तव्य संजय राऊत यांनी खोडलं आहे. यामुळे गितेंनी मांडलेली भूमिका योग्य आहे की, संजय राऊत यांची पक्षाची भूमिका योग्य आहे? याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करावे अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केलं आहे.

गितेंच्या वक्तव्यासंदर्भात दरेकर यांनी म्हटलं आहे की, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस ज्या पद्धतीने शिवसेनेवर दबाव टाकून पक्षाचा विस्तार करत आहेत. या सर्वाची वेदना, भावना अनंत गितेंच्या वक्तव्यातून आली असल्याचे मला वाटत आहे.अनैसर्गिक युती ही एक तडजोड होती असा उल्लेख गितेंनी केला असून तो खरा आहे. म्हणून शिवसेनेचे खच्चीकरण होत आहे. शिवसेनेचे आमदार ज्या ज्या विभागात काम करत आहेत त्यांना अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून निधी देण्याबाबतीत स्वःदुजाभाव असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
जिल्हा कमिटी नेमणूक, राज्य स्तरिय नेमणूक असो त्या ठिकाणी शिवसेनेचा मंत्री असूनही वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत.या सर्वामुळे अनंत गिती यांचे वक्तव्य आलं आहे की, शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारायचे आहे की, गितेंचे वक्तव्य संजय राऊत यांनी खोडलं आहे. या संदर्भात अनंत गितेंची भूमिका बरोबर आहे की,संजय राऊत यांची पक्षाची भूमिका आहे.हे जनतेला कळाले पाहिजे. शिवसेनेची काय भूमिका आहे की, गितेंची भूमिका बरोबर आहे की, संजय राऊत यांची पक्षाची भूमिका आहे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. गितेंनी पाठित खंजीर खुपसण्यासंदर्भात वक्तव्य केलं आहे. त्याच्याबाबत महाराष्ट्राला न्यात आहे. या राज्याचे सरकार बनवण्यासाठी कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसून सरकार बनवले आहेत हे स्पष्ट दिसत असल्याचा घणाघात दरेकर यांनी केला आहे.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

रिलायन्स रिटेलने डिझायनर रितु कुमारच्या ब्रँडमधील 52% ...

रिलायन्स रिटेलने डिझायनर रितु कुमारच्या ब्रँडमधील 52% हिस्सा खरेदी केला
अब्जाधीश मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स रिटेल ...

जावेद अख्तर यांचे मोठे विधान, फिल्म इंडस्ट्री हायप्रोफाईल ...

जावेद अख्तर यांचे मोठे विधान, फिल्म इंडस्ट्री हायप्रोफाईल असण्याची किंमत मोजत आहे
चित्रपट अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या प्रकरणाबाबत जावेद अख्तरने मोठे विधान ...

तो अपघात नव्हे खूनच! अखेर ‘त्या’ खूनाचे गूढ उलगडले

तो अपघात नव्हे खूनच! अखेर ‘त्या’ खूनाचे गूढ उलगडले
पुणे एक्सप्रेस हायवेजवळील रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका मालवाहू टेम्पोला आग लागली. ...

धक्कादायक ! दुसऱ्या पत्नीसाठी पहिल्या पत्नीला ‘शॉक’ देत ...

धक्कादायक ! दुसऱ्या पत्नीसाठी पहिल्या पत्नीला ‘शॉक’ देत जीवे मारण्याचा प्रयत्न
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दुसऱ्या पत्नीसाठी ...

मराठी भाषेत पदवी प्राप्त पालिका कर्मचाऱ्यांना वेतनवाढ

मराठी भाषेत पदवी प्राप्त पालिका कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळणार
मराठी भाषा विषयामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दोन ...