शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 जानेवारी 2019 (18:03 IST)

शिवस्मारक राज्यातील ११ कोटी जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न

अरबी समुद्रात उभारण्या येणारं शिवस्मारक हा राज्यातील ११ कोटी जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मात्र, सरकार त्याबाबत गंभीर नाही आणि म्हणूनच त्याचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली आहे, अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेच्या दुस-या टप्याची सुरुवात आज नाशिक येथून होत आहे. त्याआधी नाशिक येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आ. जितेंद्र आव्हाड हे उपस्थित होते. शिवस्मारकाचे काम थांबवण्यात आल्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देतांना मुंडे म्हणाले की, हा विषय न्यायालयीन वादात अडकू नये याची काळजी घ्या हे मुख्यमंत्र्यांना याआधीच सांगितले होते. याच्या निविदा प्रक्रियेतही घोटाळा झाल्याची तक्रार खुद्द समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली होती. भूमिपूजन करून दिशाभूल करण्यापेक्षा सरकारने जनतेच्या भावनेचा हा विषय गांभीर्याने हाताळला पाहिजे.