रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 फेब्रुवारी 2021 (08:32 IST)

तर काय टिपु सुलतान जयंती साजरी करणार का ?, मनसेचा सवाल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवजयंती साजरी करण्याचा मुद्द्यावर ठाकरे सरकारवर चांगलीच खिल्ली उडवली आहे. आपल्या महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करणार नाही, तर काय टिपु सुलतान जयंती साजरी करणार का ? असा सवाल मनसेकडून विचारण्यात आला आहे. शिवजयंती साजरी करण्यासाठी कसली बंधने टाकत आहात ? असा सवाल मनसेकडून करण्यात आला आहे. अजान स्पर्धा भरविणारे, बारच्या वेळा वाढवून देणारे, निवडणुकांमध्ये कोरोनाची नियमावलीची पायमल्ली चालते अशा शब्दात मनसेने ठाकरे सरकारला टार्गेट केले आहे.
 
शिवजयंती हा आपला सण, ज्या छत्रपति शिवाजी महाराजांमुळे आपण आहोत त्यांची जयंती साजरी करताना कसली बंधने टाकत आहात असा सवाल मनसेने केला आहे. त्यामुळे शिवजयंतीसाठीची नियमावली वेळीच बदला आणि जनतेला ग्राह्य धरू नका असा इशारा मनसेने दिला आहे. आपल्या महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करणार नाही, तर काय टिपू सुलतानची साजरी करणार का ? असा सवाल मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केला आहे.