शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 19 मार्च 2022 (08:42 IST)

जागतिक जल दिनानिमित्त मंगळवारी विशेष प्रदर्शन

जागतिक जलदिनानिमित्त महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिनांक २२ मार्च २०२२ रोजी विशेष प्रदर्शन आयोजित केले आहे. जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड, कुलाबा, मुंबई येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल, अशी माहिती प्राधिकरणाचे सचिव रामनाथ सोनवणे यांनी दिली आहे.
 
भूजल व भूपृष्ठावरील उपलब्ध पिण्यायोग्य पाण्याचा काटकसरीने वापर करणे, पाण्याची बचत करणे आणि भूजल पाण्याच्या पातळीत वाढ होण्यासाठी पर्जन्य जलसंचयासारखे उपक्रम राबवणे यासाठी मोठ्या प्रमाणावर समाज प्रबोधन व जनजागृती करणे आवश्यक आहे. या हेतूने हे प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे. प्रदर्शनास जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देऊन पाणी बचतीसाठी वैयक्तिक व सामूहिकरित्या योगदान द्यावे, असे आवाहन जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे सदस्य श्री. संजय कुलकर्णी (जसं), श्रीमती श्वेताली ठाकरे (अर्थ) आणि श्रीमती साधना महाशब्दे (विधी) यांनी केले आहे.