testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

चलो गोवा : नाताळ, नवीन वर्ष सेलिब्रेशसाठी विशेष ट्रेन

Last Updated: गुरूवार, 21 नोव्हेंबर 2019 (11:33 IST)
नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी कोकणात आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने ४३ विशेष
ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. एलटीटी,पनवेल ते करमाली दरम्यान या विशेष ट्रेन चालविण्यात येणार आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस - करमाली स्पेशल ट्रेनच्या १४ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. दर शुक्रवारी रात्री १ वाजून १० मिनिटांनी सुटणार आहे. त्याच दिवशी दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी करमालीला पोहचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी ०१०४६ ट्रेन दर शुक्रवारी दुपारी १ वाजता सुटून त्याच रात्री १२ वाजून २० मिनिटांनी एलटीटीला पोहचणार आहे. ही ट्रेन २२ नोव्हेंबर ते ३ जानेवारी दरम्यान चालविण्यात येणार आहे.

एलटीटी-करमाली ट्रेन दर शुक्रवारी (२२ नोव्हेंबर ते ३ जानेवारी) रात्री ८ वाजून ४५ मिनिटांनी सुटणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी करमालीला पोहचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी ट्रेन दर रविवारी (२४ नोव्हेबंर ते ५ जानेवारी) दुपारी १ वाजता सुटणार आहे आणि रात्री १२ वाजून २० मिनिटांनी एलटीलीला पोहचणार आहे.

या दोन्ही स्पेशल ट्रेनला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, संगमेश्वर, रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ ,सावतंवाडी आणि थिविम या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.

याशिवाय पनवेल-करमाली स्पेशल ट्रेन दर रविवारी रात्री १२ वाजून ५५ मिनिटांनी सुटणार आहे. त्याच दिवशी दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी करमालीला पोहचणार आहे. ही ट्रेन २३ नोव्हेंबर ते ५ जानेवारी दरम्यान सुटणार आहे.

या स्पेशल ट्रेनला रोहा,माणगाव, खेड,चिपळुण, संगमेश्वर रोड,रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग कुडाळ ,सावंतवाडी आणि थिविम या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. प्रवासी या स्पेशल ट्रेनचे आरक्षण २०
नोव्हेंबर पासुन सुरू करण्यात आलं आहे.यावर अधिक वाचा :

आता दहावी बारावीत कोणीच नापास होणार नाही, राज्य सरकारचा ...

आता दहावी बारावीत कोणीच नापास होणार नाही, राज्य सरकारचा निर्णय
दहावी व बारावीच्या गुणपत्रिकेवर आता ‘नापास’ किंवा ‘अनुत्तीर्ण’ शेरा असणार नाही. कारण ...

पीएमसी बँक घोटाळा, मुख्यमंत्री ठाकरे घेणार मोठा निर्णय

पीएमसी बँक घोटाळा, मुख्यमंत्री ठाकरे घेणार मोठा निर्णय
ठाकरे सरकार पीएमसी बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत दिसून येत आहे. ...

भाजपला आता बसणार धक्का बारा आमदार पक्ष सोडणार अशी चर्चा

भाजपला आता बसणार धक्का बारा आमदार पक्ष सोडणार अशी चर्चा
विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीला पराभूत करायला माजी मुख्यमंत्री भाजपा नेते ...

राज ठाकरे पानिपत चित्रपटाबद्दल काय म्हणतात ?

राज ठाकरे पानिपत चित्रपटाबद्दल काय म्हणतात ?
सध्या बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक चित्रपट रिलीज होत आहेत. या आगोदर बाजीराव मस्तानी, पद्मावत, ...

शिवसेना-काँग्रेसमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन मतभेद?

शिवसेना-काँग्रेसमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन मतभेद?
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. आता हे विधेयक ...

उन्नाव बलात्कार प्रकरण : दोषींना फाशी द्या, पीडितेच्या ...

उन्नाव बलात्कार प्रकरण : दोषींना फाशी द्या, पीडितेच्या बहिणीची मागणी
न्याय मिळवण्यासाठी न्यायालयातील लढाई आम्ही सुरुच ठेवणार आहोत. ज्या लोकांनी माझ्या बहिणीवर ...

भारतात बलात्कार पीडितांना उशीरा न्याय मिळतो का?

भारतात बलात्कार पीडितांना उशीरा न्याय मिळतो का?
हैदराबादमधल्या बलात्कार प्रकरणातील 4 आरोपींचं कथित एन्काउंटर झाल्यानंतर भारतातील ...

टाटाची नवी कार, सिंगल चार्जिंगवर चालणार 300 Km

टाटाची नवी कार, सिंगल चार्जिंगवर चालणार 300 Km
टाटा मोटर्स नेक्सॉन एसयूव्ही इलेक्ट्रिक व्हेरिएंटमध्ये बाजारात आणणार आहे. नेक्सॉन ...

नवा विक्रम १६७ चेंडूत ५५ चौकार आणि ५२ षटकार तब्बल ५८५ धावा

नवा विक्रम १६७ चेंडूत ५५ चौकार आणि ५२ षटकार तब्बल ५८५ धावा
भारताच्या एक शाळेतील विद्यार्थ्याने क्रिकेटमध्ये अप्रतीम असे प्रदर्शन घडवत संपूर्ण देशाचे ...

मुंबईत भरधाव कार तरुणीच्या जीवाशी 23 वर्षीय तरुणीचा जागीच ...

मुंबईत भरधाव कार तरुणीच्या जीवाशी 23 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू
भरधाव कार फूटपाथवर चढून झालेल्या अपघातात २३ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबईतील ...