मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 जुलै 2024 (21:51 IST)

विधान परिषद सभागृहात शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवे यांचं निलंबन

सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. विधानपरिषदेत भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना विरोधी पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्या प्रकरणात अंबादास दानवे यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्याचं  पाच दिवसांसाठी सदस्यत्व पद निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे विरोधकांनी सभागृहात घोषणाबाजी केली. 

लोकसभेत कॉग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भाषणावर निषेध ठराव मंजूर करण्याचा प्रस्ताव सत्ताधारी आमदारांनी विधानपरिषदेत काल मंडल असून राहुल गांधी यांच्या भाषणावर अंबादास दानवे यांनी भूमिका मांडण्याची मागणी सत्ताधारी आमदारांकडून करण्यात आली. या वर दानवे यांनी लोकसभेत झालेल्या घडामोडींवर चर्चा करण्याची गरज विधान परिषदेत नाही असे म्हटले. सत्ताधारी आमदारांनी अंबादास दानवे यांना विरोध केला. या वर दानवे यांनी प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली .

या प्रकरणी अंबादास दानवे यांचे 5 दिवसांसाठी निलंबन विधानपरिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी केलं. या कारवाईवर विरोधकांनी विरोध केला आणि निलंबनावर चर्चा करण्याची मागणी केली. त्याचा सत्ताधाऱ्यांनी विरोध केला. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तिथे उपस्थिती होती. विरोधकांनी सभापतींच्या विरोधात घोषणा दिल्या. 
 
Edited by - Priya Dixit