बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (23:24 IST)

आमच्या काळातील कामकाजाची पावती असा तो निकाल आहे.- पंकजा मुंडें

pankaja munde
राज्यात नुकताच  93 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे, यामध्ये  पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात भाजपला काही ठिकाणी जागा मिळा्ल्या आहेत. बीडमध्ये मुंडे विरुद्ध मुंडे असा संघर्ष नेहमी पाहायला मिळतो. यंदा धनंजय मुंडे यांना भाजपने धक्का दिला आहे. बीडमधील पाचही नगरपंचायतींमध्ये पंकजा मुंडे समर्थकांनी बाजी मारली आहे. त्यामुळे आता  त्यानंतर पंकजा मुंडे यांनी त्यांचे बंधू  धनंजय मुंडेंना टोला लगावला आहे. फक्त पालकमंत्रीपद असून चालत नाही, आमच्या काळातील कामकाजाची पावती असा तो निकाल आहे.
 
बीडमधली लढत मुंडे विरुद्ध मुंडे अशी नव्हती. लोकांचा गेल्या अडीच वर्षातील कामकाजाचा राग आणि आमच्या काळातील कामकाजाची पावती असा तो निकाल आहे. बीड जिल्ह्यात एकल संघ असा भाजपा सोडून कोणताही पक्ष नाही. जे नेते आहेत हे एका भागापूरते आहेत. भाजपा ही विरोधात नाही, सत्तास्थापनेचा जनादेश दिला आहे, जो विजय मिळाला आहे तो कार्यकर्त्यांचा विजय आहे असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे. . भाजपाला ज्या जास्त जागा मिळाल्या आहेत याचा आनंद आहे असंही त्यांनी सांगितलं.