सिनेमांचे शूटिंग झालेला ‘तो’ बगिचा समस्यांच्या विळख्यात

municipal garden
Last Modified शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (16:26 IST)
अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या भितींच्या पायथ्याशी असणा-या बगिच्याची अत्यंत दुरावस्था झाल्याचे दिसून येत आहे. समस्यांच्या विळख्यात सापडलेला या बगिच्याकडे पर्यटकांनी पाठ फिरविली आहे .
अकोले तालुक्यातील पश्चिमेला तालुक्यापासुन ४९ कि मी .वर १९१६ साली ब्रिटीशांनी भंडारदरा धरणाची निर्मिती केली .त्याच वेळी भंडारदरा धरणाच्या बगिच्याची निर्मिती देखील झाली .
राजकपुरसारखा प्रसिद्ध सिनेकलाकारही या बगिच्याच्या प्रेमात पडल्याने ब-याच चित्रपटांचे चित्रीकरणही या बगिच्यात केले गेले . परंतु याच बगिच्याचे आता विद्रुपीकरण झाले असुन याला केवळ भंडारदरा धरणाचे जलसंपंदा विभागाचे उदासिन धोरण कारणीभुत ठरले आहे .

बगिच्यामध्ये पर्यटकांना बसण्यासाठी बनविलेले कठडे ठिकठिकाणी तुटले आहेत तर काही जमिनदोस्त झाले आहेत . बगिच्यात रोज होणारी स्वच्छता थांबल्याने जागोजागी कच-यांचा खच तयार झाला आहे .तर घाणीचे साम्राज्य पसरल्याने सर्वत्र दुर्ग॔धी सुटली आहे .काही वर्षापूर्वी या बगिच्यात एक तलाव बांधण्यात आला होता .हा तलाव कायम कोरडाठाक असतो .तलावात तलावापेक्षा जास्त उंचीचे गवत वाढले आहे .

भंडारदरा धरणाच्या या बगिच्याचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे बगिचामध्ये असणारा नयनरम्य ” अंब्रेला धबधबा ” हा धबधबा दुरुस्तीच्या नावाखाली जलसंपदा विभागाच्या भंडारदरा धरण शाखेने कायम बंद ठेवणेच पसंत केले. भंडारदरा धरणाच्या बगिच्याला भले मोठे प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे .मात्र हे प्रवेशद्वार कायम कुलुपबंद अवस्थेत असल्याने पर्यटकांना आडबाजुने कसातरी प्रवेश करुन बगिच्यामध्ये जाण्याची वेळ आली आहे .या बगिच्याची ओळख पुसु नये यासाठी काळजी घ्यावी व पुन्हा पुर्वीचे वैभव करुन द्यावे ही इच्छा स्थानिक नागरीक जलसंपदा विभागाकडे व्यक्त करत आहेत.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

शरद पवार म्हणाले, काँग्रेसला बाजूला करुन कोणताही पर्याय ...

शरद पवार म्हणाले, काँग्रेसला बाजूला करुन कोणताही पर्याय देणार नाही
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल ...

'जोखीम' देशांतील 6 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, ओमिक्रॉन ...

'जोखीम' देशांतील 6 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, ओमिक्रॉन शोधण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंगसाठी नमुने पाठवले
1 डिसेंबरपासून, कोरोनाचे नवीन स्वरूप ओमिक्रॉनची चाचणी घेण्यासाठी विमानतळांवर धोकादायक ...

काय सांगता ,कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 60 हजार ...

काय सांगता ,कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 60 हजार रुपयांचा स्मार्टफोन मिळणार मोफत, जाणून घ्या काय आहे योजना
अहमदाबाद. अहमदाबाद महानगरपालिकेने लोकांना COVID-19 विरुद्ध संपूर्ण लसीकरणासाठी ...

भाजप नेते संमेलनात सहभागी होणार असल्याची माहिती भुजबळांनी ...

भाजप नेते संमेलनात सहभागी होणार असल्याची माहिती भुजबळांनी दिली
नाशिकमध्ये होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पत्रिकेत नावावरून ...

सहायक कक्ष अधिकारी अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या ...

सहायक कक्ष अधिकारी अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या संकेतस्थळावर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ४ सप्टेंबर, २०२१ रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा, ...