गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 फेब्रुवारी 2024 (15:14 IST)

आईच्या डोक्यात वरवंटा घालून मुलाने केली हत्या, आरोपी मुलाला अटक

murder
वर्धाच्या आर्वी तालुक्यात कांचनूर गावात जन्मदात्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनैतिक संबंधाला विरोध केल्यावर एका मुलाने आपल्या  आईला संपवले. या प्रकरणी आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सोपान मुरलीधर पुसदकर असे या आरोपी मुलाचे नाव आहे तर मीरा मुरलीधर पुसदकर असे या मयत महिलेचे नाव आहे.  
 
वृत्तानुसार, आरोपी मुलाचे गावातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. हे गेल्या अनेक महिन्यांपासून एकमेकांच्या संपर्कात होते.ही बाब आईला समजल्यावर तिने विचारपूस केली नंतर मुलाने सारवासारव करून गोष्ट टाळली. नंतर आईला खात्री झाल्यावर मुलाचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे समजले तेव्हा तिने याचा विरोध केला. त्यांच्यात वाद झाले. 

मुलाने रागाच्या  भरात येऊन आईला मारहाण केली नंतर आतून वरवंटा आणून आईच्या डोक्यात मारले.आई रक्ताच्या थारोळ्यात पडली.नंतर त्याचा राग शांत झाल्यावर त्याला केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला. नंतर पोलिसांनी त्याचावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहे. 
 
 Edited by - Priya Dixit