गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 फेब्रुवारी 2024 (09:26 IST)

मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला

eknath shinde manoj jarange
आता मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने सशस्त्र पोलीस तैनात केले आहेत.

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण केले होते. मात्र या उपोषणस्थळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांच्या लाठीचार्जचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र दौरा करत मराठा आंदोलन राज्यभर पोहचवले.

आमरण उपोषण, आंदोलन अशा अनेक कठीण पायऱ्या पार करत, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्याची शपथ जरांगे यांनी घेतली होती. याशिवाय त्यांनी मराठा आरक्षण मिळावे यासाठी मुंबईवर मोर्चा काढला. मात्र राज्य सरकारने मराठा मोर्चा वाशी याठिकाणी थांबवत मराठा आरक्षणाचा मसुदा मनोज जरांगे यांना दिला. यामुळे मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला मोठे यश मिळाले.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor