शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (08:02 IST)

प्रतीक्षा संपली, सिंधुदुर्गातील वैद्यकीय महाविद्यालयाला एनएमसीची अखेर मान्यता

सिंधुदुर्गातील वैद्यकीय महाविद्यालयाला एनएमसीने अखेरमान्यता दिली. या शैक्षणिक वर्षापासून एमबीबीएस डॉक्टरांचा पहिला वर्ग सुरू होतील,अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.गेली पंचवीस-तीस वर्षे सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रतीक्षेत होता. काहींनी लोकांसाठी नाही तर स्वतःसाठी विद्यालय मंजूर करून घेतले होते,असा टोलाही विनायक राऊत यांनी नारायण राणेंना लगावला आहे.नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेज नंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता देत ठाकरे सरकारने राणेंना पुन्हा दे धक्का दिला.
 
कोकणात गेली २५ वर्षे शासकीय महाविद्यालयाची मागणी होत होती. ही मागणी मान्य करीत १०० मुलांच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी मिळाल्यामुळे सिंधुदुर्ग वासियांची प्रतीक्षा संपली आहे सिंधुदुर्ग वासियांना खऱ्या अर्थाने बाप्पा पावला असल्याची प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली आहे यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धन्यवाद देत त्यांनी दिलेला शब्द अखेर पाळला असून गणपती बाप्पा पावला असल्याचे विनायक राऊत म्हणाले. 
 
सिंधुदुर्गच्या ओरोस येथील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातच प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबत प्रक्रिया सुरु करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षी दिले होते. याबाबत मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर सिंधुदुर्ग येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबत बैठक पार पडली होती.या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले होते.