या शहरात वृक्षतोड पडणार महागात, होणार मोठा दंड

tree love
Last Modified सोमवार, 20 जून 2022 (22:03 IST)
राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने सुधारणा केलेल्या कायद्याची आता अहमदनगर शहरातही कडक अंमलबाजवणी करण्यात येणार आहे.
त्यामुळे यापुढे विना परवाना वृक्षतोड करणाऱ्यांना पन्नास हजार रुपयांचा दंड होणार आहे. महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. यावर्षीच्या पावसाळ्यात मोठ्या उंचीच्या ५ हजार झाडांची लागवड करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.

वृक्ष प्राधिकरणाची सभा अध्यक्ष तथा आयुक्त शंकर गोरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. सरकारच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम,१९७५ या कायद्यात सुधारणा करुन अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला आहे.

त्यावर यामध्ये चर्चा झाली. या सुधारणा परिपत्रकातील १३ क्रमांकाच्या मुद्द्यानुसार बेकायदा वृक्ष तोड केल्यास जास्तीत जास्त १ लाख रुपयांपर्यंत मर्यादित दंड होईल, असे म्हटले आहे. या मुद्द्यावर सदस्यामध्ये प्रदिर्घ चर्चा झाली. अहमदनगर शहरात यापुढे बेकायदा वृक्षतोड झाल्यास ७ वर्ष वयाच्या पुढील प्रती वृक्षासाठी ५० हजार रुपये दंड आकरण्याचा निर्णय घेण्यात आला.
सुधारित कायद्यानुसार ५० वर्षे किंवा त्याहुन अधिक वयाचे “हेरिटेज ट्री” (प्राचीन वृक्ष) तोडण्याची परवानगी देण्यात येणार नाही. अपवादात्मक परिस्थितीनुसार वृक्ष प्राधिकरणाने परवानगी दिल्यास त्याबदल्यात नुकसान भरपाई म्हणून वृक्षांच्या वयाच्या संख्ये एवढी झाडे लावावीत.

त्यांचे ७ वर्षापर्यंत संगोपन करावे, अशी अट आहे. दर पाच वर्षांनी वृक्ष गणना होणार आहे.या सभेत वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य उपायुक्त- यशवंत डांगे,नगरसेवक- महेंद्र गंधे, हरियालीचे अध्यक्ष- सुरेश खामकर,तुलसीराम पालिवाल,
मनपा शिक्षण विभागाचे पर्यवेक्षक जुबेर पठाण, बांधकाम विभागप्रमुख- सुरेश इथापे, सामाजीक वनिकरण विभागाच्या सहाय्यक विभागीय अधिकारी- श्रीमती पठाण, यांनी झालेल्या चर्चेत सहभाग घेतला. सदस्यांचे स्वागत, विषयांचे वाचन व आभार उप-वृक्षाधिकारी तथा प्राधिकरण सचिव शशिकांत नजान यांनी केले.


यावर अधिक वाचा :

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट
नवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवट पाहणं का टाळलं होतं?
13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी दिल्या अशा शुभेच्छा
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल
नाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...

उमेश कोल्हे हत्या प्रकरण : मास्टरमाइंड शेख इरफान 7 ...

उमेश कोल्हे हत्या प्रकरण : मास्टरमाइंड शेख इरफान 7 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत
महाराष्ट्रातील अमरावती येथील उमेश कोल्हे खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार शेख इरफान शेख रहीम ...

हाय प्रोफाइल मद्यपी तरुणींचा भररस्त्यात धिंगाणा

हाय प्रोफाइल मद्यपी तरुणींचा भररस्त्यात धिंगाणा
भोपाळमधील होशंगाबाद रोडवर असलेल्या एका पबच्यासमोर बुधवारी रात्री उशिरा दोन मुलींमध्ये ...

विधिमंडळाचे विशेष अधिवेशन: 'गमतीचा भाग जाऊ द्या म्हणत' ...

विधिमंडळाचे विशेष अधिवेशन: 'गमतीचा भाग जाऊ द्या म्हणत' अजितदादांची भाजपवर टोलेबाजी
विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे नेते राहुल नार्वेकर यांची निवड झाली. त्यांची निवड झाल्यावर ...

पीव्ही सिंधू ताइ त्झू यिंग कडून पराभूत झाल्यानंतर मलेशिया ...

पीव्ही सिंधू  ताइ त्झू यिंग कडून पराभूत झाल्यानंतर मलेशिया ओपनमधून बाहेर
दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू मलेशिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन महिला एकेरीच्या ...

NEET 2022: नीट परीक्षेसाठी ड्रेस कोड आणि मार्गदर्शक तत्त्वे ...

NEET 2022: नीट परीक्षेसाठी ड्रेस कोड आणि मार्गदर्शक तत्त्वे जाणून घ्या
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट-अंडरग्रेजुएट किंवा ...