रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 1 मे 2019 (09:37 IST)

वंचित बहुजन विकास आघाडीच्या दोघांनवर वार, अवैध सावकारीचा प्रकार

पंढरपूर येथे निवडणुकांच्या मध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. बहुजन विकास आघाडीचे जिल्हा संघटक माऊली हळणवर व तानाजी हळवणर दोघांवर काही लोकांनी धारदार शस्त्राने वार केलेत. या प्रकारामुळे परिसरात जोरदार खळबळ उडाली आहे ईश्वर वठार परिसरात हळवणर राहतात. त्यांच्या घरात चार ते पाच जणांच्या टोळीने घुसून हल्ला केला असून, यामध्ये त्यांनी धारदार शस्त्राने वार करत माऊली, तानाजी हळवणर यांना गंभीर दुखापत झाली आहे.
 
या प्रकरणी प्राथमिक अंदाजानुसार अवैध सावकारकारीतूनच्या व्यवहारातून हा हल्ला झाल्याची माहिती देण्यात आली आहे. ही घटना घडताच माऊली आणि तानाजी यांना तात्काळ पंढरपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकाराची माहिती पंढरपूर पोलिसांना देण्यात आली असून, या प्रकरणाचा तपास करत आहेत. घरात घुसून वार केलेली टोळी नेमकी कोणती होती याचा शोध घेण्याचं काम पोलीस करत आहेत. या प्रकरणी पोलीस हळवणर यांच्या कुटुंबीयांची चौकशी पोलीस करणार आहे. या हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही तपासत आहेत.