सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 सप्टेंबर 2022 (08:13 IST)

आम्ही दोघांनी एकत्र पूजा केली होती, ते विसरले काय ? चंद्रकांत खैरे यांचा सवाल

chandrakant khaire
माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अमित शहांवर निशाणा साधला. ही मुंबई बाळासाहेब ठाकरेंची आहे, हा महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरेंचा आहे. हवेत  तर तुम्ही लोकं आहात, तुम्हाला जमीन दाखवली पाहिजे, हे पाप करत आहेत पाप, अमित शहा हे हनुमान भक्त आहेत, आम्ही दोघांनी एकत्र पूजा केली होती, ते विसरले काय, असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी विचारला आहे. तसेच, मुंबईत आम्ही प्लॅनिंग केलं आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या १५१ जागा निवडून येणार, मी भर उन्हात सूर्यनारायणाच्या साक्षीने सांगतो, असे भाकीतही खैरे यांनी केले.
 
"उद्धव ठाकरेंवरील टीका सहन करणार नाही. शिवसेनाला कोणीच संपवू शकलं नाही, तुम्ही नष्ट व्हाल पण शिवसेना संपणार नाही. ते काय आम्हाला जमीन दाखवणार, आम्हीच जमीन दाखवू. अमित शाह यांनीच शब्द फिरवला. शाह यांच्यासारख्या व्यक्तीने खोटं बोलणं चुकीचं" असे खैरे यांनी म्हटले.