1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 20 जानेवारी 2021 (22:29 IST)

परीक्षा कधी घ्यायच्या याचा आढावा आम्ही पुढील बैठकीत घेऊ : बच्चू कडू

दहावी आणि बारावीची परीक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे परीक्षा कधी घ्यायच्या याचा आढावा आम्ही पुढील बैठकीत घेऊ, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे. “राज्यातील परीक्षांबाबत योग्य तो विचार सुरु आहे. याबाबतचा सगळा विचार करून दहावी बारावी स्थानिक स्तरावर नियोजन केले जाईल. येत्या 2 फेब्रुवारी किंवा 3 फेब्रुवारीला या बैठकीत नियोजन करून चांगल्या पद्धतीने निर्णय घेतला जाईल,” असे बच्चू कडू म्हणाले.
 
“विद्यार्थ्यांसाठी दहावी आणि बारावीची परीक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे या परीक्षा कधी घ्यायच्या याचा आढावा पुढील कॅबिनेटला घेणार आहोत. परीक्षा घेऊ त्यावेळी कोविड राहणार नाही. कोरोना हकलण्यात आम्हाला यश मिळालं आहे,” असेही बच्चू कडूंनी सांगितले.