शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 27 ऑगस्ट 2016 (11:46 IST)

गणेशोत्सवासाठी कोकणात विनाटोल गाड्या!

पुणेमार्गे कोकणात जाणाऱ्यांना टोलमधून सूट देण्याची मागणी नितेश राणेंनी केली होती. मात्र ती सरकारने धुडकावून लावली. त्यानंतर स्वाभिमानने थेट रस्त्यावर उतरुन विनाटोल गाड्या सोडण्यास सुरुवात केली आहे. स्वाभिमानचे कार्यकर्ते खालापूर टोलनाक्यावर उपस्थित राहून कोकणात जाणाऱ्या गाड्यांना विनाटोल सोडत आहेत.

राज्य सरकार कोकणी माणसावर अन्याय करत आहे. स्वाभिमानचे कार्यकर्ते 4 सप्टेंबरपर्यंत खालापूर, लोणावळा या टोलनाक्यांपासून कोल्हापूरपर्यंत उभे राहून कोकणात जाणाऱ्या वाहनांना विनाटोल पाठवणार आहेत. यामुळे तरी राज्य सरकारला जाग येईल आणि टोलमुक्तीसाठी पुढाकार घेईल, असे नितेश राणे म्हणाले विनाटोलसाठी तुमच्या गाडीवर फक्त कोकणात जात असल्याचं पोस्टर किंवा स्टिकर लावलेलं पाहिजे, असे राणे यांनी सांगितलं.