शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By वेबदुनिया|

तब्बल चार वर्षानंतर नर-मादी धबधबा वाहू लागला

WD
येथील ऐतिहासिक किल्लतील प्रेक्षणीय व नयनरम्य असणारा नर-मादी धबधबा तब्बल चार वर्षानंतर शनिवारी सकाळी 11 वाजल्यापासून ओसंडून वाहू लागला आहे. हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी यत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. नर-मादी बरोबरच किल्ल्यातील शिलक धबधबा देखील चांगलाच वाहू लागला आहे.

नळदुर्ग किल्ल्यातील नर-मादी व शिलक धबधबे जुन्या काळापासूनच प्रसिद्ध आहेत. हे धबधबे सुरू झाल्यानंतर पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक नळदुर्ग नगरीत दाखल होतात. मात्र मागील चार वर्षापासून निसर्गाच्या अवकृपेमुळे या भागात पाऊस अतिशय कमी झाल्याने या ननरम्य धबधब्यांचे डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य पर्यटकांना पाहता आले नाही. पर्यटक किल्ला पाहण्यासाठी येत होते. मात्र किल्ल्यातील नर-मादी व शिलक धबधबा वाहत नसलचे पाहून ते निराश होऊनच परतत असायचे.

यंदाच्या वर्षी पावसाळतील तीन महिने अशीच परिस्थिती होती. परंतु गणपती बाप्पांच्या आगमनापासून पावसाने पुनरागमन केले. मागील सलग 10 दिवस गणेशोत्सव कालावधीत झालेल्या जोरदार पावसाने केवळ 10 दिवसांतच बोरी धरण पूर्ण क्षमतेने भरले. मागील 10 दिवसांपूर्वी याच धरणात केवळ 26 टक्के एवढा पाण्याचा साठा शिल्लक होता. मात्र दमदार पावसामुळे हे धरण आता 100 टक्के भरले आहे.

नळदुर्ग किल्लतील नर-मादी धबधबा पाहाला तुम्ही गेलात, आणि पाऊस आला तर तो एक अनोखा अनुभव ठरेल.

उत्तरेच बाजूने वाहत येणारी बोरी नदी किल्लयाचा आत येऊन तिला चंद्रकोरीचा आकार देऊन पुन्हा उत्तरेकडे वळविली आहे. पूर्व-पश्चिम असा हा बंधारा अतिशय कल्पकतेने परंतु भक्कम अशा तर्‍हेने बांधलेला आहे. बंधार्‍याच्या वरच्या बाजूला नदीच्या पुराचे पाणी वाहून जावे म्हणून दोन भले मोठे सांडवे तयार करण्यात आले आहेत. या दोन सांडवंना नर व मादी अशी नावे देण्यात आलेली आहेत. यालाच नर-मादी धबधबा असे म्हणतात. पावसाळ्यात नदीला पाणी आले, की नर-मादी धबधबतील पाणी पुढे 100 फूट खाली खोल जाऊन आदळते. ते सुंदर व विहंगम दृश्य पाहताना अक्षरश: डोळ्यांचे पारणे पिटले. या धबधब्याचे वैशिष्टय़ म्हणजे, अगदी जवळ जाऊन तेथून धबधबा पाहता यावा, म्हणून गॅलरीची व्यवस्थाही करण्यात आली आहे. 1853 मध्ये इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला.