शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , गुरूवार, 21 जुलै 2016 (13:30 IST)

नदीपात्रात दोन मुलींचे मृतदेह सापडल्याने खळबळ

मुळा मुठा नदीच्या पात्रात दोन शालेय मुलींचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. पालकांच्या भीतीनं त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. स्नेहा मोरे आणि छोटीकुमारी सिंग अशी या मुलींची नावं आहेत. त्यांचा मृतदेह चंदननगरच्या परिसरात आढळला. या घटनेचा तपास चंदननगर पोलीस करत आहेत.

16 तारखेला वडगाव परिसरातील चार मुली काही मित्रांसोबत फिरायला गेल्या होत्या. त्यापैकी दोघी मुली घरी परतल्याच नाहीत. त्यांचा मृतदेह नदीत दोरीने हातात हात बांधलेल्या अवस्थेत नदीच्या पात्रात आढळला आहे.