शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 29 जून 2016 (11:11 IST)

महाराष्ट्रात पुन्हा लैंगिक शिक्षण

लैंगिक शिक्षण कार्यक्रम महाराष्ट्रात पुन्हा सुरू करण्यात येणार असून  आमदारांची दहा सदस्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

एड्स नियंत्रणासाठी स्थापन करण्यात आलेल्या व विधिमंडळ चर्चापीठची बैठक आज विधानभवनात पार पडली. या बैठकीत लैंगिक शिक्षण व जीवन कौशल्य कार्यक्रम स्थगित करण्यात आला असल्याबाबचा विषय अजेंड्यावर होता. या कार्यक्रमाचा फेर विचार करण्यात  यावा, तसेच  या कार्यक्रमाची गरज, शेजारच्या राज्यातील परिस्थिती आणि तज्ज्ञ सल्ला यासाठी आमदारांची दहा सदस्यांची समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणी आमदार  आशिष शेलार यांनी केली. त्यावर समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हा फोरम स्थापन करण्यात आला असून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे,  विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर, आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार भाई गिरकर, भारती लव्हेकर, फोरमचे अन्य  सदस्य यावेळी उपस्थित होते.