शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 9 ऑगस्ट 2016 (11:02 IST)

मुख्यमंत्री, शिवसेना पक्ष प्रतोद यांची वन टू वन चर्चा

शिवसेना पक्ष प्रतोद आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सव्वा तास विभागनिहाय वन टू वन चर्चा केली.

या बैठकीत भाजप आमदारांइतकाच निधी सेना आमदारांनाही देण्याचे निश्चित झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रतोद यांची वर्षा बंगल्यावरील बैठक झाली. या बैठकीवेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम उपक्रममंत्री एकनाथ खडसे, शिवसेनेचे आमदार सुनिल प्रभू, संजय शिरसाठ, शंभुराजे देसाई, सुभाष साबणे, अनिल कदम, प्रताप सरनाईक, अजय चौधरी,  नीलम गोऱ्हे आदी उपस्थित होते.

यावेळी प्रत्येक प्रतोदाने आपल्या विभागातील आमदारांच्या समस्या समजावून सांगितल्या. तसेच या समस्या सोडवण्यातील सर्व अडचणी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंनी समजून घेतल्या. या बैठकीवेळी शिवसेनेच्या विभागनिहाय आमदारांची सर्व लोकोपयोगी कामेही लेखी स्वरूपात मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. फडणवीस, ठाकरे आणि शिवसेना पक्ष प्रतोद तीन महिन्यांनंतर पुन्हा रिव्ह्यू बैठक घेणार आहेत.