शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पंढरपूर , शुक्रवार, 15 जुलै 2016 (14:15 IST)

मुख्यमंत्र्यांनी घातलं विठुरायाला साकडं

दुष्काळाचं संकट झेलणाऱ्या महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम् कर, असं साकडं मुख्यमंत्र्यांनी  विठुरायाकडे घातलं. आषाढी एकादशीनिमित्त परंपरेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय पूजा पार पडली.

अहमदनगरचे वारकी दाम्पत्य हरिभाऊ आणि सुनीता फुंदे यांनाही शासकीय पुजेचा मान मिळाला होता. या दाम्पत्याने विठ्ठल-रुक्मिणीची षोडषोपचार पुजा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या पुजेनंतर भक्तांसाठी दर्शनाची वाट मोकळी करुन देण्यात आली.

विठ्ठल-रखुमाईचं साजिरं-गोजिरं रुप डोळ्यात साठवण्यासाठी वारकऱ्यांची झुंबड उडाली.