शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By वेबदुनिया|

राज ठाकरेंना विकत घेणारा जन्माला आलेला नाही

WD
कोणाची हिंमत आहेल या विषयावर बोलू नका, असे मला सांगण्याची, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे अधिकारीच काय.... राज ठाकरेंना विकत घेणारा अद्याप जन्माला आलेला नाही , माझ्यावर टीका झाली तरी चालेल, चुकांवर आणि मराठी माणसाच्या हक्कांवर मी बोलणारच, असा खणखणीत इशारा महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.

महाराष्ट्र नवनिर्माण परिवर्तन दौर्‍याच्य जळगाव येथील सागर पार्कवर झालेल्या सांगता समेत लाखोंच्या जनसमुदायासबोर ते बोलत होते.

पोतडीत भरपूर आहे.... तुम्ही शांत बसला तर हळूहळू बाहेर काढतो, असे आवाहन करून ठाकरे पुढे म्हणाले, की पत्रकारांनी मलाविचारले, राज्याचे विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसेंच्याबद्दल बोलणार काय? तापी महामंडळाबद्दल बोलणार का? मी कशावर बोलावे, हे कोणी मला सांगू नये. आपण मत मागायला येत नसून, मत मांडायला येतो, त्यामुळे मी बोलणारच, असे त्यांनी स्पष्ट केले.