शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 ऑगस्ट 2016 (11:09 IST)

सीएसटीच्या दिशेना जाणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं

होणारे बिघाड आणि त्यामुळे कामावर जाण्यासाठी होणारा उशीरा यामुळे वैतागलेल्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी शुक्रवारी सकाळी लोकल अडवत रेल रोको केला. संतप्त प्रवाशांनी बदलापूर स्थानकात लोकल अडवल्याने अगोदरच विस्कळीत झालेल्या लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. 
 
भिवपुरी स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड झाला होता. ज्यामुळे सकाळी 5 वाजून 5 मिनिटांची लोकल उशिरा आली. यामुळे बदलापूरमधील संतप्त प्रवाशांनी स्टेशनवरच लोकल रोखली, आणि स्टेशन मास्तरच्या कार्यालयाला घेराव घातला. गाडी वेळेवर येईल असं लिहून देण्याची मागणी प्रवाशांनी स्टेशन मास्तरकडे केली आहे. संतप्त प्रवाशांनी कर्जतच्या दिशेने जाणारी लोकलही रोखली असल्याने दोन्ही बाजूच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सीएसटीच्या दिशेना जाणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं आहे. याशिवाय कर्जतहून येणाऱ्या लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांचाही खोळंबा झाला आहे.