धार्मिक कट्टरतेत वाढ
- अनिरुद्ध जोशी
भारतात धार्मिक कट्टरता वाढत आहे. यामुळेच दहशतवादासारखे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आता देशातील कट्टर धार्मिक असणार्या संघटनांवर बंदी आणण्याची गरज निर्माण झाली आहे. धार्मिक कट्टरतेबरोबरच धार्मिक स्थळांवर होणारे अपघात चिंताजनक ठरत आहे. या वर्षी तीन धार्मिक घटनांमुळे देश हादरला. त्यातील पहिले प्रकरण अमरनाथ ट्रस्टला दिलेली जमीन आहे. नैनादेवी मंदिरात चेंगराचेंगरीमुळे 145 जणांचा मृत्यू तर तिसर्या घटनेत जोधपूरच्या चामुंडा माता मंदिरात चेंगर चेंगरीत 216 भाविकांचा मृत्यू झाला.अमरनाथ ट्रस्टला दिलेल्या जमिनीवरून देशात मोठा वाद निर्माण झाला. जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दिवस संचारबंदी लागू होती. या प्रकरणात मेहबूबा मुक्ती यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले. दुसर्या बाजूला अमरनाथ यात्रेदरम्यान दहतवाद्यांनी हल्ले सुरूच ठेवले. यामुळे अनेक निर्दोष लोकांचे प्राण गेले, अनेक व्यक्ती जखमी झाल्यात. या परिस्थितीतही विक्रमी संख्येने भाविकांनी अमरनाथ शिवलिंगाचे दर्शन घेतले. धार्मिक कट्टरता आणि दहशतवाद: प्रत्येक धर्माच्या व्यक्तीने दुसर्या धर्माच्या विरोधात प्रचार, प्रसार केला तसेच धर्मांतराचा प्रयत्न केला. यामुळे धार्मिक कट्टरता आणि दहशतवाद वाढत चालला आहे. मदरशांसारख्या शिक्षण संस्थांमधून लहान मुलांच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न केला गेला. यामुळे पाकिस्तानमधील अनेक मदरशांवर कारवाई करण्यात आली. धार्मिक शिक्षणातून मिळणार्या कट्टरतेमुळेच दहशतवाद्यांनी आपली प्रचंड दहशत यावर्षी दाखवली. ओरीसा, कर्नाटक, मध्य प्रदेशात हिंदूत्ववादी संघटना व ख्रिश्चन यांच्यात तणाव निर्माण झाला. ओरीसाता विश्व हिंदू परिषदेच्या एका स्वामीच्या हत्येनंतर तणाव उसळला. त्यातून ख्रिश्चन संस्थांना व व्यक्तींना लक्ष्य करण्यात आले. याचेच पडसाद मध्य प्रदेश व कर्नाटकातही उमटले.दंगल- एरवी अत्यंत शांत असणार्या महाराष्ट्रातील धुळे शहरात किरकोळ कारणावरून दंगल उसळली. हिंदूत्ववादी संघटनेचे पोस्टर फाडण्यावरून उसळलेला तणाव वाढत गेला आणि यात पाच जणांचे बळी गेले. दोन धर्मात निर्माण झालेल्या या तेढीने धुळ्याच्या शांततेला नख लावले. दंगल वेळेत आटोक्यात आली नाही. ती चार-पाच दिवस धुमसत होती. मध्य प्रदेशातील इंदूरमध्येही यावर्षी दंगल झाली. यातही पाच जणांचा बळी गेला. त्यामुळे हे शहर चार दिवस बंद होते.धार्मिक स्थळी अपघात: सप्टेंबर महिन्यात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जोधपूरच्या चामुंडामाता मंदिरात चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमुळे 216 भाविकांचा मृत्यू झाला. तसेच 300 पेक्षा जास्त व्यक्ती जखमी झाल्या. या अपघाताची न्यायालयीन चौकशी करण्यात येत आहे. हिमाचल प्रदेशातील नैनादेवी मंदिरात दरड कोसळल्याचे अफवेमुळे चेंगराचेंगरी झाली. यात 145 भाविकांचा मृत्यू झाला. प्रशासनाकडून होणार्या चुकांमुळे या प्रकारचे अपघात होत आहे. यामुळे सर्वच धार्मिक स्थळांवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा आणि नियोजन करणे गरजेचे आहे.एंकदरीत मानवी मूल्य आणि धर्माला समजण्यात गल्लत होत आहे. यामुळेच या वर्षी देशात धार्मिक कट्टरतेत वाढ झाली. अनेक ठिकणी जातीय दंगली झाल्या. तसेच धार्मिक स्थळावर नियोजनाअभावी अपघातही झाले. ही प्रकरणे हताळण्यास सरकार अयशस्वी ठरले.