बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. मागोवा 2009
Written By वेबदुनिया|

सत्यमचा महाघोटाळा

WD
WD
2009 हे वर्ष उद्योगांसाठी खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरले. एकीकडे मंदीचा प्रहार आणि दुसरीकडे सत्यममधील घोटाळ्याने परकीय गुंतवणूकदारांचा कमी झालेला विश्वास असा दुहेरी सामना भारतीय कंपन्यांना बाजारात करावा लागला.

सत्यम प्रकरण उघडकीस आल्यानंतर अनेक देशांनी भारतीय उद्योगांच्या विश्वासहार्यते विषयी प्रश्न चिन्ह निर्माण करत आपल्या उद्योगांचा प्रचार करण्याचाही प्रयत्न केला. सत्यमची व्याप्ती दिवसें-दिवस वाढतच आहे. हा 14 हजार कोटीचा महा घोटाळा मानला जात आहे.

कंपनीचे संस्थापक अध्यक्ष रामलिंग राजू यांनी आपला राजीनामा देत या पत्रात आपण केलेला घोटाळा संचालक मंडळा पुढ्यात मांडला आणि या प्रकरणाचा खुलासा झाला. या प्रकरणाची सीबीआय चौकशीही करण्यात येत असून, याचा तपास पूर्ण होण्यासाठी आणखी कालावधी लागणार आहे. सत्यम प्रकरण उघडकीस आल्यानंतर सरकारने संचालक मंडळावर आपले प्रतिनिधी नियुक्त केले होते. यानंतर महिंद्रा कंपनीने सत्यमचे अधिग्रहण केल्यानंतर कंपनीची परिस्थिती पुन्हा एकदा सुधारत आहे.
WD
WD


सत्यममध्ये अमेरिकी गुंतवणूकदारांचा भरणा असल्याने अमेरिकी बाजार नियामक एसईसीनेही या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. आता केंद्र सरकारने या प्रकरणी अमेरिकेत सत्यम प्रकरणी गुन्हे दाखल होवू नयेत यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अशाने पुन्हा एकदा कंपनीवर आर्थिक संकट ओढावण्याची भीती सरकारला वाटत आहे.