शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मागोवा 2017
Written By

निरोप 2017 ला आणि 2018 चे स्वागत

सरते 2017वर्ष संपण्यासाठी एक आठवडा राहिला आहे. पण याची तयारी नाताळापासूनच सुरू होते. येणार्‍या सात दिवसात पर्यटन, धार्मिक स्थळे ही तुडुंब भरतील. वास्तविक पाहता भारतीय संस्कृतीत थर्टी फस्टला मान्यता ही पण तंत्रज्ञानाने जग एकत्र आणले आणि जगभरातील उत्सव हे आपल्याकडे साजरे होऊ लागले आहेत. आजही संस्कृतीचे ठेकेदार यासाठी राजी नाहीत पण याचा आनंद घेणार्‍यांची संख्या वाढत चाललने तेही हतबल झाले आहेत. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत या दरम्यान एकच दिवस असतो पण यात जी हजारो कोटींची उलाढाल होते यामुळे अर्थकारणालाही चालना मिळत आहे. याचे लोण ग्रामीण भागातही आता पोहोचले आहे.
 
इंग्रजी कॅलेंडरनुसारच जगाचे व्वहार चालत असल्याने थर्टीफस्टला विश्वमान्यता मिळाली आहे. यापूर्वी केवळ एक दिवस तो साजरा व्हायचा पण आता तो आठवड्याचा उत्सव बनत चालला आहे. 25 डिसेंबरला नाताळ साजरा होतो व यापासूनच शहरांमध्ये 31 डिसेंबरचे वारे वाहू लागते. सर्रास लोक सुट्‌ट्या काढून पर्यटनस्थळी जाण्यास  प्राधान्य देत आहेत. यासाठी पूर्वी गोवा, लोणावळा, महाबळेश्वर ही नावे पुढे येत असत पण आता लहान लहान स्थळांचाही असा विकास झाला आहे की तेथील निवांतपणा पर्यटकांना भुरळ घालत आहे.
 
सध्या इंटरनेटवर पाहिले तर सर्वत्र नववर्षाच्या स्वागताच्या तयारीबाबतच चर्चा सुरू आहेत. अनेक कंपन्या, हॉटेल्स, मॉल्स यच्या  ऑफर सुरू आहेत. पर्यटनस्थळाधील बुकिंग हाऊसफुल्ल आहेत. केवळ हॉटेल्समध्येच 31 डिसेंबर साजरा होतो असे नाही तर यासाठी  फिल्मसिटी, गार्डन यासह जंगल सफारीही सज्ज आहेत. विविध पार्ट्यांची रेलचेल असून संकेतस्थळावर याची माहिती लोड केली जात आहे. सरत्याला निरोप आणि नववर्षाचे स्वागत ही प्रक्रिया केवळ एक दिवसाची असली तरी याची तयारी महिनोन्‌ महिने केली जाते. शहरी भागात 25 डिसेंबरपासून कंपनंमध्ये हजेरी कमी असते. आयटी क्षेत्रातील मंडळी या काळात खूप एन्जॉय करीत असल्याचे चित्र असते. परदेशात काही काळ घालविल्याने त्यांना याचे आकर्षण जास्त असते.
 
थर्टीफस्टचे सेलिब्रेशन केवळ शहरात होते असे नाही तर ग्रामीणमध्ये गावरान पध्दतीने केले जाते. अगदी दिवसभर यासाठी कार्यक्रम आखले जातात. काही धर्मरक्षक यास विरोध करतानाही दिसतात. मागील काही दिवसांपासून अ‍ॅपस्‌वर 31 डिसेंबर साजरा न करण्याचे आवाहन केले जात आहे. हे इंग्रजी कॅलेंडरनुसार असल्याचे बिंबवले जात आहे पण आज जगातील सर्व व्यवहार याच आधारे होत आहेत हे मात्र विसरून चालणार नाही. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मोठी उलाढाल बाजारात होते. यातून वपार वाढून अनेकांना रोजगारही मिळत आहे.
 
अर्थकारणाची जोड
31 डिसेंबरला जी उलाढाल होते ती केवळ मद्य व पर्यटनाची असते असे नाही तर लहान लहान हॉटेल्सधूनही ग्राहकांची गर्दी असते. सुगंधी दूध पिऊन हा दिवस साजरे करणारे लाखो लोक आहेत. बाहेरून चिवडा व अन्य पदार्थ आणून रात्री बारापर्यंत गप्पा मारणार्‍यांची संख्याही कमी नाही. टीव्हीवर या दिवशी मनोरंजनाचे अनेक कार्यक्रम असतात, याचा आस्वाद लोक घेतात. पण थर्टी फर्स्ट म्हटले की केवळ मद्यपींचे चेहरेच डोळ्यासमोर आणले जातात. ही प्रतिमा बदलणे गरजेचे आहे. आता गावोगावीही अशा पध्दतीने नववर्षाचे स्वागत होत असल्याने अर्थकारणाला चालना मिळत आहे.
 
धार्मिक पर्यटनातही वाढ
नववर्षाचे स्वागत करताना केवळ धिंगाणा घालून प्राशन करणे, फटाक्यांची आतषबाजी करणे असेच प्रकार घडतात हे समजणे चुकीचे आहे. अनेकजण या काळात धार्मिक पर्यटनाला महत्त्व देतात. देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रे या काळात भाविकांनी भरलेली असतात. नववर्षाचे स्वागत करताना व सरत्याला निरोप देताना सकारात्क उपक्रम  राबविणारीही खूप मंडळी आहेत. पूजाअर्चा करून हा उत्सव साजरा करणारेही अनेकजण आहेत. यामुळे पंढरपूर, अक्कलकोट, शिर्डी, शेगाव, तिरूपती यासारख्या क्षेत्रात मोठी उलाढाल होत असते. 
 
महसूल वाढविणारा दिवस
31 डिसेंबरला सर्वाधिक मद्य विक्री होते. पिने वालोंको..बहाना चाहिये..असे म्हटले जाते. याचे उदाहरण म्हणजे थर्टीफर्स्टच्या पार्ट्या असतात. नववर्षात दारू सोडणार असे म्हणत अनेकजण अगोदरच चार दिवसांपासून रोज मद्य प्रशासन सुरू करतात व 31 तारखेला दिवसभर तर्राट राहतात. यातून उत्पादन शुल्क विभागाला मोठा महसूलही मिळतो. यासाठी 31 डिसेंबरला रात्रीच काय पण पहाटेपर्यंत परमिट रूम व बिअर शॉपींना सुरू ठेवले जाते. याच काळात पोलिसांची गस्तही सुरू असते. याच दिवशी अनेकांना ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह अंतर्गत दंडही केले जातात. याची दुसरी बाजूही आहे की याच काळात मद्य प्राशन करून अपघातही खूप होतात. छेडछाड तसेच गोंधळ, रात्री कर्णकर्कश्य आवाज काढत फिरणारी तरुणांची टोळकी सार्वजनिक शांततेला धोका पोहोचवितात हे तितकेच खरे. यमुळे या उत्सवाला विरोध करणार्‍यांची संख्याही कमी नाही.