गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. शिवजयंती
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (23:17 IST)

असा हा होता "राजा शिवाजी महाराष्ट्राची मान

shivaji maharaj
राजा व्हावा तुज सारखा,
जनसामान्यांना वाटे तो सखा,
दरारा शत्रूसमोर ,थरथराट व्हावा,
तलवारी ची धार अशी, निप्पात करावा,
संस्कार असे तुमचे, पर स्त्री मातेसमान,
संस्कृती अशी जपावी,गौरव वाटे महान,
जीवाला जीव देणारे साथीदार मिळाले,
स्वराज्याच स्वप्न राजांचे पूर्ण जाहलें,
असा हा होता "राजा शिवाजी महाराष्ट्राची मान,
आम्ही आहोत पाईक त्यांचे, वाटते अभिमान!!
...अश्विनी थत्ते