शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकीची पराभवाची हॅट्रिक

FILE
भारतीय हॉकी संघ जर्मनीविरूद्ध २-५ ने पराभूत होऊन ऑलिम्पिक स्पर्धेबाहेर झाला आहे. याचबरोबर भारताने ऑलिम्पिकमध्ये पराभवाची हॅट्रिक पूर्ण केली. याअगोदर भारतास हॉलंडने २-३ ने पराभूत केले होते आणि न्यूझीलँडविरूद्ध १-३ ने पराभव स्विकारावा लागला होता. पदकाचा प्रबळ दावेदार जर्मनी विरूद्ध भारतीय खेळाडूंनी कुमकामी प्रदर्शनाची सीमाच लांघली.

जर्मनीने पहिल्या हाफ मध्ये ४-१ ने आघाडी घेऊन भारतीय आशांना ब्लू टर्फ मध्ये गाडले. यानंतर भारतीय संघ फक्त लाज राखण्यासाठी संघर्ष करत राहिला. जर्मनी विजयाबरोबर ब गटातून हॉलंडसोबत शीर्षस्थानी पोहचली आहे तर भारत अंतिम स्थानी आहे.

जर्मनीसाठी युवा खेळाडू फ्लोरियन फुक्स ने सातव्या, सोळाव्या आणि छत्तीसाव्या मिनिटास तीन गोल केले तर ऑलीवर कोर्न याने चोविसाव्या मिनिटास व क्रिस्टोफर वेल्सी याने ३४ व्या मिनिटास गोल केले. भारताकडून वी आर रघुनाथ ने पेनल्टी कॉर्नरच्या माध्यमाने १३ व्या मिनिटास तर तुषार खांडेकरने ६२ व्या मिनिटास गोल केले.