शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

जागतिक क्रमवारीत पेस पुन्हा 'टॉप फाईव्ह'मध्ये!

WD
अमेरिकेन ओपन टेनिस स्पर्धेत उपविजेतेपदाला गवसणी घालणार्‍या लिएंडर पेसला ताज्या टेनिस रॅकींगमध्ये लाभ झाला आहे. या भारतीय टेनिसपटूने पुरुष दुहेरीत अव्वल पाच खेळाडूत स्थान मिळविले आहे. युएस ओपनचे विजेतेपद पटकावणार्‍या अँडी मरेने राफेल नदाला मागे सारुन तिसर्‍या स्थानापर कब्जा केला आहे.

अमेरिकन ओपन मध्ये दुहेरीत उपविजेतेपद पटकावणार्‍या पेसला ताज्या क्रमवारीत चार स्थांनाचा लाभ झाला आहे. त्याने ननव्या स्थानावरुन पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. युएस ओपन मध्ये पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागणार्‍या महेश भुपती आणि बोपन्नालाही क्रमावारीत नुकसान झाले आहे.

पुरुषांच्या एकेरीत रॉजर फेंडरर आणि नोव्हाक जोकोविचचे अव्वल दोन्ही स्थानावर विराजमान आहे. अमेरिकन ओपनचे विजेतेपद पटकावणारा अँडे मरे तिसर्‍या स्थानावर पोहचला आहे. स्पेनच्या राफेल नदालला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.