शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 19 ऑक्टोबर 2015 (10:41 IST)

दीपिकाचे आव्हान संपले

फिलाडेलफिया: येथे सुरू असलेल्या अमेरिकन खुल्या स्क्वॅश स्पर्धेत भारताची दीपिका पल्लीकलचे महिला गटातील आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच समाप्त झाले. इजिप्तच्या सहाव्या मानांकित ओमेनिया कॅव्हेने दीपिकाचा 9-11, 11-6, 11-8, 2-11, 11-3 अशा गेम्समध्ये पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. या लढतीत दोन्ही खेळाडूंनी दर्जेदार खेळाचे प्रदर्शन घडविले. दीपिकाने पहिला गेम जिंकल्यानंतर कॅव्हेने पुढील सलग दोन गेम्स जिंकून आघाडी मिळवली. दीपिकाने चौथा गेम जिंकून बरोबरी साधली पण पाचव्या आणि शेवटच्या गेममध्ये कॅव्हेने खेळ करत दीपिकाचे आव्हान संपुष्टात आणले.