शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

धावपटू उसेन बोल्टने दिले निवृत्तीचे संकेत

WD
वेगवान धावपटू उसेन बोल्ट याने आंतरराष्ट्रीय स्तरावरून निवृत्त होण्याचे संकेत नुकतेच दिले. ब्रुसेल्स येथील भरगच्च पत्रकार परिषदेत बोल्टने ही घोषणा केल्यावर सर्वच जण अवाक झाले. बोल्ट म्हणाला,रियो २०१६ ऑलिंपिकनंतर निवृत्त होण्याचा आपला विचार आहे. रियोत सुवर्णकामगिरी कायम ठेवण्याची आपली इच्छा आहे. त्याचबरोबर पुढील वर्षी २०० मीटर शर्यतीत नवा विक्रम आपल्याला प्रस्थापित करायचा असून, राष्ट्रकूल स्पर्धेतही सुवर्णपदक मिळवायचे आहे.

कारकिर्दीच्या सर्वोत्तम शिखरावर असताना निवृत्त होणे कधीही चांगले, असे सांगून बोल्ट म्हणाला,कारकिर्दीत प्रत्येक वळणावर यश मिळविले. यशाच्या शिखरावर असतानाच निवृत्त होणे चांगले असते. आणखी किती वर्षे वर्चस्व राखायचे? कुठे तरी थांबायला हवे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तीन सुवर्णपदक मिळविल्यानंतर बोल्ट यंदाच्या मोसमात शुक्रवारी व्हॅन डॅम स्मृती शर्यतीत अखेरच्या शंभर मीटर शर्यतीत धावणार आहे.टड्ढॅकवर वेगवान धाव घेत क्षणभर ‘त्या’ वेगालाही मागे टाकणा-या बोल्टवर अलौकिक बॉक्सर महंमद अली आणि फुटबॉलपटू पेले यांच्या कामगिरीचा प्रभाव आहे. बोल्ट म्हणाला,महम्मद अली आणि पेले हे माझे आदर्श आहेत आणि त्यांच्याप्रमाणे मला सर्वकालीन सर्वोत्तम व्हायचे असेल,तर निवृत्तीपर्यंत माझ्या क्रीडाप्रकारात वर्चस्व राखावे लागेल.