शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By wd|
Last Updated :ब्रासोलिया , बुधवार, 11 जून 2014 (15:07 IST)

फीफा विश्वचषक 2014 : पहिला सामना हा महत्त्वाचा

ब्राझीलमध्ये खेळल्या जाणार्‍या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील उद्घाटनाचा म्हणजेच पहिला सामना हा अंतिम सामन्या इतकाच महत्त्वाचा राहील, असे राईट-बॅक खेळाडू डानी अल्वेस याने सांगितले.

12 जून रोजी यजमान ब्राझील आणि क्रोएशिातील लढतीने या स्पर्धेस सुरुवात होणार आहे. या सामन्याबाबत तो बोलत होता. ब्राझीलने शुक्रवारी खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात सर्बियाविरुद्ध 1-0 असा विजय मिळविला. यावेळी घरच्या मैदानावरील प्रेक्षकांनी हुर्रे उडविला आणि ब्राझील संघाच्या क्षमतेबाबत शंका उपस्थित केल्या आहेत. परंतु या शंका अल्वेसने त्वरित फेटाळून लावल्या आहेत.

गुरुवारी, जेव्हा स्पर्धा होईल तेव्हा यजमान राष्ट्राचे खेळाडू हे त्यांच्या सर्वोत्तम खेळ करतील. खरेपणाचा क्षण आता सुरू होत आहे, असे त्याने पत्रकारांना सांगितले. सुरुवातीचा सामना हा केवळ तीन गुण मिळविणकरिताच नाही तर तो या स्पर्धेत खेळणार्‍या प्रतिस्पर्धी संघांना संदेश देणारा ठरेल, असे तो म्हणाला. इतर संघांना इशारा देणसाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे, असे मला वाटते आणि तो अंतिम सामन्यासारखा राहील, अशी भरही त्याने घातली.

ब्राझीलच्या राष्ट्रीय संघाचे सावोपावलो प्रेक्षकांशी दीर्घकाळाचे संबंध आहेत व त्यासंबंधाची यावेळी चाचणी ठरणार आहे. सर्बियाविरुद्धच्या सामन्यात खेळाडू संघर्ष करीत होते. परंतु यावेळी मात्र वेगळे राहील. आम्ही आमच्या घरच्या मैदानावर खेळत आहोत आणि प्रेक्षक हे निश्चितपणे आमच्या बाजूने उभे राहतील आणि ब्राझीलचा संघ विजेतेपदाचा स्पर्धक राहील, असेही अल्वेस म्हणाला. रिओ दि जानेरोच्या उत्तरेकडे असलेल्या मैदानावर ब्राझील संघाचे प्रशिक्षण झाले. सावोपावलो येथे संघ परतल्यानंतर सुमारे हजार दर्शकांनी या संघाचे स्वागत केले. दोन आठवडय़ापूर्वी वेगळी स्थिती होती, असेही त्याने  स्पष्ट केले.

प्रेक्षकांना पाहणे हे आमच्यासाठी एक प्रकारची देणगीच आहे. विश्वचषक ब्राझीलला आहे आणि त्याचे आश्चर्यकारक क्षण पाहावास मिळणार आहेत. हे ब्राझीलच्या जनतेला समजून येईल आणि ही स्पर्धा यशस्वी होईल, असे शेवटी तो म्हणाला.