शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: लंडन , बुधवार, 25 जुलै 2012 (15:08 IST)

फेडरर, अझारेंकाला अव्वल मानांकन

WD
येत्या शुक्रवारपासून सुरू होणार्‍या लंडन ऑलिम्पिकच्या टेनिसमध्ये स्वितझर्लंडचा रॉजर फेडररला पुरुष एकेरीसाठी, तर बेलारूसचया व्हिक्टोरिया अझारेंकाला महिला एकेरीसाठी अव्वल मानांकन देण्यात आले आहे.

लंडन ऑलिम्पिकच्या टेनिस स्पर्धेच्या 'ड्रा' येत्या गुरुवारी जाहीर केला जाणार असून, उद्‍घाटन सोहळ्याच्या दुसर्‍याच दिवसापासून टेनिस सामन्यांना सुरुवात होणार आहे. ऑलिम्पिकमध्ये महिला आणि पुरुष एकेरीत प्रत्येकी 64 खेळाडू सहभागी होत असून, 11 जूनच्या जागतिक क्रमवारीनुसार 16 खेळाडूंचे मानांकन ठरविण्यात येणार आहे. अलीकडेच विम्बल्डनचे सातवे विजेतेपद पटकावणार्‍या फेडररने 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये स्टॅनिसलास वाबरिकासोबत पुरुष दुहेरीत सुवर्णपदक पटकावले असून, आता तो पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करणार आहे.