शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

मराठमोळ्या राही सरनोबतचा सुवर्णवेध

WD
महाराष्ट्रातील मराठमोळी सुकन्या राही सरनोबत हिने कोरियामध्ये सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय नेबाजी क्रीडा ‍संघाच्या नेमबाजीच्या विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरण्याची ‍ऐतिहासिक कामगिरी केली. 25 मीटर पिस्तूल प्रकारात राहीने हा पराक्रम रचलाआणि भारताचा तिरंगा डौलाने फडकावला.

नेमबाजी विश्वचषक स्पर्धेतील 25 मीटर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत कोरियाच्या किम क्याँगेचे कडवे आव्हान राही सरनोबतपुढे होते, परंतु जराही न डगमगता, अत्यंत संयमाने, शांत डोक्याने राहीने आलपी पिस्तूल चालवली आणि 8-5 अशी बाजी मारली. या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी ती पहिली भारतीय नेमबाज ठरली. 2011मध्ये अमेरिकेतील विश्वचषक स्पर्धेत राहीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.