शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

माझा चार्‍यासारखा वापर करण्यात आला: सानिया

ND
ND
लंडन ऑलिम्पिकमध्ये वाइल्ड कार्डद्वारा प्रवेश करणारी भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाने भारतीय टेनिस संघावर आपला चार्‍यासारखा वापर करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

सानिया म्हणाली की, नाराज लिएंडर पेसला मनवण्यासाठी माझा वापर करण्यात आला. टेनिस संघाचे आचरण अपमानजपक असून यामधून पुरूषी अहंकाराचा गंध येत असल्याचे ती म्हणाली.

लिएंडर पेस सोबत जोडी बनवण्याबबत तक्रार नसल्याचे तिने स्पष्ट केले. मात्र संघनिवड वादात आपला वापर करण्यासाठी टेनिस महासंघावर तिने घणाघाती टिका केली आहे.