शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

सानिया मिर्झा यूएस ओपनच्या दुहेरीत उपांत्य फेरीत

WD
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीत भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाने चीनच्या जी झेंगच्या साथीने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

या स्पर्देत बुधवारी भारताचा टेनिसपटू लिअँडर पेसने रोडेक स्टेपनाकच्या साथीने पुरूष दुहेरीत प्रवेश केला होता. आता दहाव्या मानांकित सानिया मिर्झा-झेंग या जोडीनेही उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सानिया-झेंग यांनी चौथे मानांकन असलेल्या चीनच्या शुआई पेंग आणि तैवानच्या शू वे शिय या जोडीचा 6-4, 7-6 असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला.

पहिल्या सेटमध्ये 6-4 असा सहज विजय मिळविल्यानंतर सानिया-झेंगला दुसऱ्या सेटमध्ये कडवी झुंज मिळाली. पण, या दोघींनीही संयम दाखवत प्रतिस्पर्ध्यांची सर्व्हिस ब्रेक करत पॉईँट मिळविला आणि सेटही जिंकला. दुसरा सेट टायब्रेकरमध्ये या जोडीने 7-5 असा जिंकला.