शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

सायनाने जिंकली थायलंड ओपन

PR
भारताची बॅडमिंटनमधील सुपरस्टार सायना नेहवालने ऑलिम्पिकपूर्वी हा किताब जिंकून एक महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. त्यामुळे तिचे मनोबल वाढले आहे. सानाने थायलंडच्या द्वितीय मानांकित रत्चानोक इंथोनोन हिचा एसीसीजी थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये पराभव करीत या वर्षातील दुसरे विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे पहिला गेम गमावल्यानंतर सायनाने एक तास पाच मिनिटे रंगलेल्या फायनलमध्ये जबरदस्त मुसंडी मारताना प्रतिस्पध्र्यावर १९-२१, २१-१५, २१-१0 असा दणदणीत विजय मिळवला.

या वर्षी सायनाने मार्च महिन्यात बेसल येथे स्वीस ओपन स्पर्धा जिंकली होती. जागतिक क्रमवारीत पाचव्या मानांकनावर असणार्‍या सायनाने पूर्ण सामन्यात अवघे आठ स्मॅश विनर मारले; परंतु तुलनेत थायलंडच्या खेळाडूने १७ स्मॅश विनर मारले. तथापि, सायनाचा नेटवरील खेळ झकास झाला. तिने ३0 नेटविनर मारले, तर प्रतिस्पध्र्याला अवघे १६ नेटविनर मारता आले.