शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

सायना, अजय, गुरुसाईदत्त उपांत्यपूर्व फेरीत

WD
द्वितीय मानांकनप्राप्त आणि गतविजेती भारताच्या अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने इंडोनेशियन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत साजेसा खेळ करताना, उपांत्यपूर्वपर्यंत मजल मारली. अन्य लढतीत आरएमव्ही गुरुसाईदत्त यानेही उपांत्यपूर्व फेरीत आपला प्रवेश निश्‍चित केला.

भारताच्या गुरुसाईदत्त याने ५९ मिनिटांपर्यंत चाललेल्या अटीतटीच्या लढतीत २१-१२, ९-१२, २१-१९ असा विजय मिळविला. सायनाला उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत आता स्पेनच्या कॅरोलिना मारिन हिच्याशी झुंज द्यावी लागेल.

अजय जयराम याने इंडोनेशियाच्या सोनी देई कोनकोरोवर २२-२0, २२-१२ असा विजय मिळविला. विशेष म्हणजे, एखाद्या बॅडमिंटन स्पर्धेत आमने-सामने येण्याची सायना आणि कॅरोलिना यांची ही पहिलीच वेळ आहे.
भारताचा युवा बॅडमिंटन खेळाडू आरएमव्ही गुरुसाईदत्त याला उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंडोनेशियाच्या टॉमी सुगियार्तोशी सामना करावा लागणार आहे. टॉमी याने उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत हाँगकाँगच्या विंग की वांगला २१-१८, २१-१६ अशी धूळ चारण्यात यश मिळविले होते. सुगियार्तो यांच्या विरुद्ध आतापर्यंत झालेल्या ३ लढतीत गुरुसाईदत्तला एकदा विजय मिळविता आला आहे. तर दोन सामन्यांत त्याला पराभव स्वीकारावा लागला आहे.