शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: चंदीगड , शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016 (11:47 IST)

सुवर्ण पदक मिळालेले पाहायचे - बलबीरसिंह

हॉकीत ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत आठवेळा सुवर्णपदक मिळविणार्या भारताला पुन्हा सुवर्णपदक मिळालेले आपल्याला पाहायचे आहे. हेच आपले अंतिम स्वप्न आहे, अशी प्रतिक्रिया भारताचे ख्यातनाम हॉकीपटू बलबीरसिंह (सिनियर) यांनी व्यक्त केली. गतकाळात बलबीरसिंह यांनी विविध सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन केले होते, हे विशेष. पी.आर. श्रीजेशच्या नेतृत्वाकाली रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार्‍या भारतीय पुरुष हॉकीसंघाकडून आपल्याला भरपूर अपेक्षा असल्याचेही 92 वर्षीय बलवीसिंह यांनी नमूद केले. या वेळेच्या ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीत भारत उत्कृष्ट खेळ सादर करेल, अशी मला आशा आहे. असेही त्यांनी सांगितले. भारताने सुवर्णपदक जिंकावे, हेच माझे अखेरचे स्वप्न आहे. बलवीर सिंह ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेणारे भारताचे सर्वात वयोवृद्ध खेळाडू आहेत.