शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

स्टेफ्री ग्राफ

आंतरराष्ट्रीय कीर्तीची टेनिसपटू स्टेफी ग्राफ हिचा जन्म 14 जून 1969 रोजी जर्मनीतील मॅनेहेम या शहरात झाला. 1980 आणि 1990च्या दशकात बोरीस बेकरबरोबर स्टेफी ग्राफने जर्मन टेनिसला कीर्तीच्या शिखरावर नेऊन बसवले. स्टेफीने वयाच्या 17व्या वर्षी 1987मध्ये टेनिसमधील आपले पहिले विजेतेपद पटाकवले. त्यानंतर दोनच महिन्यांनी पॅरीस येथे झालेल्या फ्रेंच ओपन टेनिस चँपियनशिप जिंकून ती जगातील क्र.1ची महिला टेनिसपटू बनली.

PR


1988मध्ये तर तिने फ्रेंच, विम्बल्डन, मेलबर्न आणि न्यूयॉर्कमध्ये ग्रँड स्लॅम किताब जिंकले. ऑलिंपिकमध्येही तिने सुवर्णपदक जिंकले. 1997मध्ये वडिलांबरोबर झालेल्या वादानंतर तिने ‍टेनिस खेळायचे काही काळ थांबवले. पण 1999मध्ये तिने ‍फ्रेंच ओपन जिंकल्यानंतर तिने या खेळातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. स्टेफीने तिच्या कारकिर्दीत 107 सामने जिंकले. त्यातील 22 ग्रँह सलॅम आहेत.