शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

हॉकी इंडिया लीग : सरदारवर सर्वाधिक बोली

WD
इंडियन प्रीमिअर लीगच्या धर्तीवर हॉकीमध्येही सुरु करण्यात आलेल्या हॉकी इंडिया लीगसाठी खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. यात भराताचा कर्णधार सरदार सिंग आणि ड्रॅग फ्‍लिकर व्ही. आर. रघुनाथ यांच्यावर सर्वाधिक बोली लावण्यात आली.

सरदार सिंग हा या लिलावात सर्वाधिक रक्कम मिळविणारा खेळाडू ठरला. दिल्लीच्या वेवराडर्स संघाने सरदारला 78 हजार अमेरिकन डॉलर्सला (42.49 रुपये) खरेदी केले, तर रघुनाथला सहारा उत्तर प्रदेश फ्रेंचायजीने 76 हजार अमेरिकन डॉलरला (41.40 लाख रुपये) खरेदी केले. याबरोबरच उत्तरप्रदेश फ्रेंचायजीने टिऊन दी नॉयजेर याला 66 हजार अमेरिकन डॉलर्स (35.93 लाख रुपये) खरेदी करीत संघाला आणखी बळकटी दिली.