शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

'लाल मातीचा’ बादशाह!

WD
‘क्ले कोर्ट किंग’ अर्थात लाल मातीचा बादशाह नदालने अंतिम लढतीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा ६-४, ६-३, २-६, ७-५ ने पराभव करीत रोला गॅरोजवरील वर्चस्व कायम राखले. या पराभवामुळे जोकोविचचे सलग चार ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटाकवण्याचे स्वप्न भंगले. नदालचे हे ११वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद आहे. नदालने आज जोकोविचचा पराभव करीत सलग तीन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत पत्कराव्या लागलेल्या पराभवाची परतफेड केली.

रविवारी पावसाच्या व्यत्ययामुळे जोकोविच व नदाल यांच्यादरम्यानची अंतिम लढत पूर्ण होऊ शकली नाही. पावसाच्या व्यत्ययामुळे रविवारी खेळ थांबविण्यात आला त्या वेळी नदालने दोन तर जोकोविचने एक सेट जिंकला होता. पहिले दोन सेट गमावणार्‍या जोकोविचनने तिसरा सेट ६-२ने जिंकल्यानंतर चौथ्या सेटमध्ये २-१ अशी आघाडी मिळवली असताना पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवावा लागला. आज त्यापुढे नदालने चमकदार विजेतेपदाची औपचारिकता पूर्ण केली.