शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 फेब्रुवारी 2022 (15:59 IST)

डॅनिल मेदवेदेव लवकरच नोव्हाक जोकोविचच्या जागी नंबर वन टेनिसपटू होणार

डॅनिल मेदवेदेवने एटीपी क्रमवारीत अव्वल स्थानावर जाण्यासाठी मजबूत वाटचाल केली . त्याने मेक्सिको ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पाब्लो अंदुजरवर 6-1, 6-2 असा विजय मिळवला. अकापुल्कोमध्ये विजेतेपद जिंकल्यास 26 वर्षीय मेदवेदेव सध्या नोव्हाक जोकोविचकडे असलेल्या जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असून नोव्हाक ची जागा घेणार.आणि नंबर वन टेनिसपटू होऊ शकतात. रशियन खेळाडू मेदवेदेवचा पुढील सामना टेलर फ्रिट्झ किंवा योशिहितो निशिओकाशी होईल.