मंगळवार, 2 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 6 मार्च 2022 (16:15 IST)

डेव्हिस कपमध्ये भारताने डेन्मार्कवर 4-0 ने विजय मिळवला

India beat Denmark 4-0 in Davis Cup डेव्हिस कपमध्ये भारताने डेन्मार्कवर 4-0 ने विजय मिळवलाMarathi Sports News In Webdunia Marathi
डेव्हिस कप वर्ल्ड ग्रुप 1 मध्ये पोहोचण्यासाठी रोहन बोपण्णा आणि दिविज शरण यांना भारताला विजयमिळवून देणं आवश्यक होता. दोन्ही खेळाडूंनी दिल्ली जिमखानाच्या कोर्टवर फ्रेडरिक निल्सन आणि मिकेल टॉरपीगार्ड यांना तीन सेटच्या लढतीत पराभूत करून जागतिक गटात भारताचे स्थान निश्चित केले.
 
बोपण्णा-शरण, फेब्रुवारी 2019 नंतर त्यांचा पहिला डेव्हिक कप सामना खेळत असताना त्यांनी 118 मिनिटांच्या संघर्षात निल्सन-टोरपिगार्ड यांचा 6-7(3), 6-4, 7-6(4) असा पराभव केला. पहिला सेट टायब्रेकरमध्ये गमावल्यानंतर बोपण्णाने दुसऱ्या सेटच्या पहिल्याच गेममध्ये निल्सनची सर्व्हिस तोडून दुसरा सेट जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये स्कोअर 5-6 होता आणि दिविज त्याच्या सर्व्हिसवर 0-40 ने पिछाडीवर होता. डेन्मार्कचे तीन मॅच पॉइंट होते, पण डेनिस संघाला तीन गुण सोडवता आले नाहीत आणि भारताला 3-0 अशी अभेद्य आघाडी मिळाली. 
पहिल्या रिव्हर्स सिंगल्समध्ये रामकुमार रामनाथनने इंगल्डसनचा 5-7, 7-5, 10-7 असा पराभव करून भारताला 4-0 असा विजय मिळवून दिला .