टोकियो ऑलिम्पिक डायरी : पंधरा मिनिटांचं स्वातंत्र्य, चिंता आणि रोमांच

Tokyo Olympics 2021
Last Modified बुधवार, 21 जुलै 2021 (22:31 IST)
जान्हवी मुळे
टोकियोमध्ये सध्या दोन शब्द सर्वाधिक ऐकू येत आहेत. Anxiety आणि Excitement. चिंता आणि रोमांच. अशा दोन टोकांच्या भावना एकाच वेळी अनुभवणं काय असतं, ते खरंतर शब्दांत नीट मांडताही येणार नाही.
मी दिवसभर काम करून आताच हॉटेलवर माझ्या खोलीत परतले आहे. आम्हाला आता इथे पंधरा मिनिटं बाहेर जाण्याची परवानगी मिळाली आहे.

पंधरा मिनिटं म्हणजे फक्त पंधराच मिनिटं. तेही गर्दीत जायचं नाही, फक्त जरा पाय मोकळे करण्यासाठी किंवा जवळच्या दुकानातून गरजेच्या वस्तू विकत घेण्यासाठीच ही सूट मिळाली आहे. हॉटेलच्या लॉबीतच आयोजकांनी नेमलेले सुरक्षारक्षक आहेत, जे एरवीही आमच्या येण्याजाण्याची वेळ नोंदवून ठेवतात.
पंधरा मिनिटं हा केवढा कमी वेळ वाटतो, पण खरं तर टीव्ही मीडियाच्या भाषेत पंधरा मिनिटं हा खूप जास्त वेळ आहे आणि नियोजन केलं, तर सगळं वेळेत करता येतं.
आज मी फक्त समोरच्या गल्लीत गर्दी नसलेल्या फुटपाथवर थोडी चालत गेले, जवळ कुठली दुकानं आहेत हे पाहून घेतलं, म्हणजे असं नियोजन करायला सोपं जाईल.
अपेक्षेप्रमाणेच आसपास सगळेजण मास्कमध्ये आणि अंतर राखून चालत होते. पंधरा मिनिटांचा मास्कआडचा हा मोकळा श्वासही बरा वाटावा असं वातावरण होतं.

रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच टॉवर्स आणि त्यांच्यातल्या फटीतून दिसणारा सूर्यास्त. तसं कुठल्याही शहरात हे असं एवढंसंच आभाळ वाट्याला येतं. पण इथे सगळंच बंदिस्त झालेलं असताना त्याची जाणीव आणखी तीव्रतेनं होते.
पंधरा मिनिटांच्या त्या फेरीदरम्यान मला दोन अँब्युलन्स जाताना दिसल्या. आता हे लिहते आहे, तेवढ्यातच बाहेरून आणखी एक अँब्युलन्स जाताना सायरन ऐकू येतो आहे.

टोकियोत आज अठराशेहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, असं आताच बातम्यांमध्ये सांगितलं. कोव्हिडच्या संसर्गाच्या घटना वाढतायत, इथे तिसरी लाट येण्याची भीती काहीजण बोलून दाखवतायत. आणि अशातच ऑलिम्पिकचं आयोजन होतंय.
फुटबॉल आणि सॉफ्टबॉलच्या स्पर्धा परंपरेप्रमाणे उद्घाटन सोहळ्याआधी म्हणजे बुधवारपासून (21 जुलै) सुरुही झाल्या आहेत.
एका क्षणी आम्ही मैदानात कोणता विक्रम पाहायला मिळेल याविषयी बोलतो आहोत, तोच दुसऱ्या कुणाच्या टीमचे खेळाडू विलगीकरणात असल्याचं कळतं, तिसरा तुमचे आवडते खेळाडू कोण म्हणून विचारतो तर चौथा पीसीआर टेस्टची आठवण करून देतो.

कोव्हिड टेस्टची आता खरंच सवय होऊन गेली आहे, हे मी आधीच्या डायरीमध्येही लिहिलं होतंच. आता जसजशी इथे येणाऱ्या लोकांची संख्या वाढते आहे, तसं वेगवेगळ्या भाषा कानावर पडू लागल्या आहेत.
खूप वर्षांपूर्वी भेटलेले किंवा एरवी ज्यांच्याशी इंटरनेटवरूनच संपर्क व्हायचा असे लोक प्रत्यक्ष भेटू लागले आहेत- अर्थात सोशल डिस्टंसिंगसह.

मुख्य म्हणजे बऱ्याच महिन्यांनी मी कोव्हिडशिवाय इतर विषयांवर जास्त बोलते आहे. ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांची हीच तर खासियत असते.

इथे फक्त खेळाडूंचा मेळावा भरत नाही, तर पत्रकार, स्वयंसेवक, अधिकारी, प्रेक्षक अशांच्या रूपानं अनेकजण एकत्र येतात आणि सांस्कृतिक देवाणघेवाण होते. म्हणूनच तर काहीजण ऑलिंपिकचं वर्णन 'वर्ल्ड्स बिगेस्ट इव्हेंट' म्हणजे जगातला सर्वात मोठा सोहळा म्हणून करतात.
पण यंदा अर्थातच कोव्हिडमुळे गणितं बदलली आहेत.
सकाळीच इथल्या एका पेपरमध्ये बातमी वाचली की, जपानचे सम्राट कदाचित ऑलिंपिकच्या उद्घाटन सोहळ्यात 'सेलिब्रेशन' हा शब्द वापरणार नाहीत.

हीच जपानमधल्या अनेकांची भावना आहे. जपानसाठी ऑलिंपिक ही साजरं करण्याची गोष्ट नाही, तर दिलेलं वचन पूर्ण करण्याची जबाबदारी आहे, असं त्यातून दिसून येतं.


यावर अधिक वाचा :

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व
जान्हवी मुळे तुम्हाला माहिती आहे का? यंदा टोकियो ऑलिंपिकमध्ये अनेक खेळाडूंसोबतच एक ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची 'योग्य' वेळी निवड करू'
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून, ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील कुटुंबियांकडून धुळ्याच्या तरूणाचे अपहरण
सोशल मीडियावर केलेली मैत्री धुळे येथील एका तरूणास चांगलीच महागात पडली असून, महिलेच्या ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता सामान्य लोकांसाठी हे महत्त्वपूर्ण काम सुकर केले आहे
COVID-19 च्या दुसऱ्या लहरीमध्ये आता आधार कार्डधारक कधीही आणि कोठूनही त्यांचे आधार कार्ड ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते वापराशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्या
Battlegrounds Mobile India (BGMI) अधिकृतपणे भारतात लाँच केले गेले. खेळाच्या लाँचची घोषणा ...

नाशिक महापालिकेची निवडणूक अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ...

नाशिक महापालिकेची निवडणूक अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढवणार
नाशिक महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचं जाहीर केल्यानंतर आता मनसे आगामी ...

केंद्राने जाहीर केलेली रक्कम आणि आता असणाऱ्या पूरजन्य ...

केंद्राने जाहीर केलेली रक्कम आणि आता असणाऱ्या पूरजन्य परिस्थितीचा दुरान्वये संबंध नाही
केंद्राने जाहीर केलेली रक्कम आणि आता असणाऱ्या पूरजन्य परिस्थितीचा दुरान्वये संबंध नाही ...

Tokyo Olympics : ऑस्ट्रेलियन एथलीटचा खुलासा, कंडोमच्या ...

Tokyo Olympics : ऑस्ट्रेलियन एथलीटचा खुलासा, कंडोमच्या मदतीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले!
टोकियो ऑलिंपिकच्या सी -1 स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची केनो स्लॅलम महिला खेळाडू जेसिका फॉक्सने ...

दुकांनाच्या वेळ तसेच विकेंडलाही दिलासा मिळण्याची शक्यता

दुकांनाच्या वेळ तसेच विकेंडलाही दिलासा मिळण्याची शक्यता
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे काही ...

राज्यातील काही भागांत 4 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा

राज्यातील काही भागांत 4 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा
महापुरातून पश्चिम महाराष्ट्र आणि रायगडसह कोकण सावरत असतानाच पुन्हा एकदा हवामान विभागाने ...