शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: ओस्ट्राव्हा , बुधवार, 23 मे 2012 (14:30 IST)

आता बोल्टचे लक्ष्य 9.7 सेकंद

WD
उसेन बोल्ट हा जगातील सर्वांत वेगवान मनुष्य आहे, हे आतापर्यंत अनेकदा सिद्ध झालेले आहे. शंभर मीटर आणि दोनशे मीटर शर्यतीमध्ये विश्‍वविक्रमी वेळ नोंदविणाऱ्या बोल्टला आता शुक्रवारी होणाऱ्या युरोपीय शर्यतीत ही वेळ आणखी सुधारण्याची इच्छा आहे. या स्पर्धेतील 100 मीटर शर्यतीमध्ये 9.7 सेकंदांची वेळ नोंदविण्यासाठी तो प्रयत्नशील आहे.

याच शहरामध्ये चार वर्षांपूर्वी झालेल्या शर्यतीमध्ये बोल्टने 200 मीटर शर्यतीत 19.83 सेकंदांची वेळ नोंदवत विक्रम केला होता. ""मला हे शहर आणि इथले वातावरण आवडते. त्यामुळेच, दरवर्षी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे वाटत असते,'' असे 25 वर्षीय बोल्टने सांगितले. याच महिन्याच्या सुरवातीला झालेल्या "किंग्जटन इन्व्हिटेशनल' 100 मीटर शर्यतीमध्ये बोल्टने 9.82 सेकंद वेळ नोंदविली होती.