आदित्य राऊतचा आगळावेगळा विश्वविक्रम
पुण्याचा जलतरणपटू आदित्य राऊतने 25 दिवसात 5 खंडातील 9 देशांच्या 9 खाड्या पार करून अनोखा विश्वविक्रम नोंदविला आहे. आदित्याने 26 जुलैला 26 कि.मीची स्वीस खाडी यशस्वीरित्या पार करून आपल्या अभियानाचा श्रीगणेशा केला होता.चिन्मय मिशन आयोजित स्पर्धेतही आदित्यने विजय मिळवून जगातील पहिल्या सहा जलतरणपटूंमध्ये स्थान पटकावले होते. आपले मिशन यशस्वीरित्या पूर्ण करून मुंबईत परतल्यानंतर त्यांने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रशिक्षक विनय मराठे व वडील संतोष राऊत यांचे मार्गदर्शन लाभल्याचे आदित्यने सांगितले.