शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: टोकियो , सोमवार, 26 सप्टेंबर 2011 (12:17 IST)

चेंग लोंग, यिहान जपान ओपनचे विजेते

जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या मलेशियाच्या ली चोंग वेईचा पराभव करून चीनच्या चेंग लोंगने जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष गटाचे अजिंक्यपद पटकावले. गेल्या आठवड्‍यात चायना मास्टर्स जिंकणार्‍या चोंगचा त्याने 21-8, 10-12 आणि 21-19 असा पराभव केला.

महिला गटाचे अजिंक्यपदही चीननेच राखले. जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या वांग यिहानने जर्मनीच्या ज्युलियन शेंकचा 21-16 आणि 21-14 असा पराभव करून ‍अजिंक्यपद पटकावले.