शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

जपान ओपनमध्ये सिंधूवर मदार

WD
सायना नेहवालच्या अनुपस्थितीत जगातील १०वी मानंकित महिला स्टार पीवी सिंधु दोन लाख डॉलर बक्षीस रक्कम जपान ओपन सुपर सीरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय दलाचे नेतृत्व करेल.

विश्व चॅम्पियनशिपमध्ये कास्य पदक जिंकलेल्या सिंधुला या स्पर्धेसाठी आठवी मानंकन मिळाले. सुरूवातीचे दोन राउंडमध्ये त्याचा सामना क्वालीफायर खेळाडूंशी होईल आणि पुन्हा नंतर तिस-या फेरीत ते जगातील सर्वोच्च मानंकित ऑलिम्पिक चॅम्पियन चीनच्या ली जुइरेईशी सामना करेल.सिंधुने यापूर्वी जुइरेईला पराभूत केले आहे. मुंबईची तन्वी लाड, जी की जगातील ७७व्या मानंकित खेळाडू आहे महिला वर्गात समाविष्ट दुसरी भारतीय आहे. पहिल्या फेरीत लाडचा सामना जपानची सायाका ताकाहाशीशी होईल.

पुरुष एकेरीत भारतीय खेळाडूंना कठिण ड्रॉ मिळाला. जगातील १३व्या मानंकित खेळाडू पारूपल्ली कश्यपला पहिल्या फेरीत जपानच्या शो शाकाशीशी सामना करायचा आहे. आतापर्यंत कश्यप दोन सामन्यात शाकाशीने पराभूत झाला आहे.जर कश्यप शाकाशीला यशस्वी राहिला तेव्हा तो दुस-या फेरीत चीनच्या चेन लोंगशी सामना करेल ज्याला पराभूत करणे त्याच्यासाठी आणखी कठीण काम ठरू शकते.जगातील २०व्या मानंकित आरएमवी गुरुसाई दत्तला पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या द्वी कुनचोरोशी सामना करेल.उदयमान खेळाडू बी. साई प्रणीतला पहिल्या फेरीत हाँगकाँगच्या हुन युनशी सामना करायचा आहे तसेच सौरव वर्माला पहिल्या फेरीत सोपा डॉ मिळाला. तो क्वालीफायरशी सामना करेल.